शालेय जीवनापासूनच मैदानाशी मैत्री करा- खासदार धैर्यशील मोहिते पाटील

भारतीय संस्कृतीत खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे खेळाच्या माध्यमातून जगणं सुंदर होत‌ आहे. गेली ४२ वर्ष समृद्ध परंपरा जपत राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून या दुष्काळी मातीतल्या असंख्य खेळाडूंना त्याचबरोबर राज्यातून परराज्यातून आलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो जेवढं अभ्यासाला महत्त्व तेवढेच खेळालाही महत्त्व द्या. शालेय जीवनात मैदानावर असणाऱ्या विविध प्रकारच्या खेळाच्या संधी वाया घालवु नका. जो युवक आपल्या शालेय जीवनापासूनच मैदानाशी मैत्री करतो तो जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर कधीही हताश होत नाही निराश होत नाही म्हणूनच शालेय जीवनापासूनच मैदानाशी मैत्री करा असे प्रतिपादन माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.

https://youtu.be/GhZROJ5JLdM?feature=shared

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त, कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके ४३ वा.स्मृतीसमारोह पुरूषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचा उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके ,उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा विक्रांत गायकवाड, पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख, सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, पंढरपूर तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, सांगोला तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे बास्केटबॉल ॲच्युअर असो.सचिव एम.शेफी, वनाधिकारी इंगोले मॅडम ,सां.ता.उच्च शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबुराव गायकवाड,सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, संस्था पदाधिकारी, देणगीदार,प्राचार्य अमोल गायकवाड उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्रमुख पाहुणे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचे हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.
त्यानंतर उद्घाटन समारंभामध्ये सुरुवातीला हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंदसिंग यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थित मैदानाचे विधिवत पूजन करून, श्रीफळ वाढवून उद्घाटन संपन्न झाले.

पुढे बोलताना मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात सांगोला अकलूज व सोलापूर या तीन ठिकाणी बास्केटबॉलचे ग्राउंड आहेत. शाळेत असणाऱ्या क्रीडा शिक्षकांच्या पाठीमागे संस्थेने उभा राहिले तर निश्चितपणाने मैदानावरून असंख्य खेळाडू घडतील.असे सांगत स्पोर्ट्सच्या माध्यमातून विविध पदांवर विराजमान खेळाडूंची उदाहरणे देत खेलो इंडिया या भारत सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनांचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला पाहिजे असा मानस व्यक्त केला.

यावेळी बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड म्हणाले कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या बास्केटबॉल सामन्यात ग्रामीण भागातील विविध खेळाडू निर्माण होत आहे.या सामन्यांची ही समृद्ध परंपरा ४२वर्षे प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी अतिशय समर्थपणे पेलेली आहे. महाराष्ट्रातील असंख्य स्पर्धक या निमित्ताने या स्पर्धेत भाग घेतात स्पर्धकांसाठी विनंती की सर्व नियमांचे पालन करत आपण या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडाव्यात.

 

 

याप्रसंगी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार म्हणाले कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती बास्केटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागात असणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहेत या स्पर्धेसाठी महाराष्ट्र कर्नाटक अशा विविध राज्यातून स्पर्धक खेळण्यासाठी येतात ही बाब निश्चितपणे स्पर्धेच्या संयोजनात उत्साह आणणारी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर बास्केटबॉल खेळाची कामगिरी वाढवायची असेल तर शाळेबरोबर विविध संघटनांनी ही चांगले प्रयत्न करावे.

या उद्घाटन सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन, सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी,सर्व सामना अधिकारी,खेळाडू, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सर्व पदाधिकारी ,विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व सांगोला तालुक्यातील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाच्या प्रास्ताविकातून संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी गेली ४२ वर्ष आयोजन, प्रत्येक वर्षी खेळाडूंचा वाढणारा उत्साह, क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजयजी बनसोडे यांनी दिलेल्या अनुदानातून बास्केटबॉलचे मैदान पुढील वर्षी बंदिस्त होणार असे सांगत पुढच्या वर्षीचे सामने इनडोअर स्टेडियम मध्ये होतील असा विश्वास व्यक्त करत उपस्थितांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर प्राचार्य अमोल गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले ‌.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button