फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थी आणि शिक्षक यांनी पंढरपूर येथील गोपाळपूर मधील श्री तनपुरे वृर्धाश्रमास भेट दिली या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तेथील जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला तसेच त्यांच्यासोबत काही वेळ व्यतीत केला याचबरोबर त्या संस्थेला छोटीशी मदत म्हणून फळे, बिस्किटे तसेच धान्य देणगी स्वरूपात देण्यात आले ही भेट विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अत्यंत मोलाची ठरली, अंत:करणपूर्वक सर्वजण त्यांचा निरोप घेऊन परत महाविद्यालयात परतले या भेटीसाठी प्रा. अमृता पिंजारी व प्रा. शौनक काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हि भेट संस्थेचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर व परिसर संचालक डॉ. संजय आदाटे तसेच पदविका विभागप्रमुख प्रा. अश्विनी झाडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.