महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी लाभ घ्यावा- कृषी अधिकारी शिवाजी शिंदे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नरेगा) अंतर्गत पात्र असलेले व फळबाग लागवडीसाठी ईच्छुक असलेले शेतकरी बांधवांनी फळबाग लागवडीचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागामार्फत कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत डाळिंब , आंबा, पेरू ,सिताफळ, लिंबू ,नारळ, आवळा, चिंच,केळी ,ड्रॕगनफ्रूट,द्राक्षे  आदी फळपिकांची लागवड करता येते. जाॕबकार्डधारक व अल्पभुधारक म्हणजे ज्यांची एकुण जमिनधारणा २.० हे किंवा त्यापैक्षा कमी आहे असे शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र आहेत. अनुसुचित जाती व अनु.जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधव २.० हे पेक्षा जास्त जमिन धारणा असले तरी लाभ घेऊ शकतील.  या योजनेअंतर्गत लाभ घेणेसाठी  ७/१२ उतारा, ८ अ उतारा, आधारकार्ड , बँक पासबुक , जाॕब कार्ड व ग्रामसभेचा लाभार्थी निवडीचा ठराव ईत्यादी कागदपत्रांसह अर्ज  कृषि सहाय्यक किंवा मंडळ कृषि अधिकारी कार्यालयास सादर करावा.

अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक ,कृषि पर्यवेक्षक , मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button