नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील चोपडी बंडगरवाडी -येथील विठोबा मारुती सरगर (वय 80) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.आज सकाळी दहा वाजता बंडगरवाडी येथील स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी चोपडी पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.चोपडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते धोंडीराम सरगर यांचे ते वडील होते.त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता बनगरवाडी येथील स्मशानभूमीत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून समजते.