फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये स्कूल बस सुरक्षितता समिती बैठक संपन्न

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे, संचलित फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये सडक सुरक्षा जीवन रक्षा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर जिल्हा अंतर्गत स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक संपन्न झाली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सांगोला पोलीस हवालदार श्री बोधगिरी, पोलीस हवालदार श्री घुले पोलीस हवालदार श्री देसाई, तसेच स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील, ए.ओ वर्षा कोळेकर वाहतूक प्रमुख श्री आकाश पुजारी हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पोलीस हवालदार श्री बोधगिरी यांनी स्कूलमधील सर्व ड्रायव्हर व बस अटेंन्डर यांना सुरक्षित वाहतूक करण्याबद्दल माहिती सांगितली. तसेच बसस्टॉप वर विद्यार्थी वर चढताना व खाली उतरताना घ्यावयाची काळजी सांगितली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा शिंदे यांनी केले, तर आभार सौ अनिता शिनगारे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी स्कूल बस ड्रायव्हर व बस अटेंन्डर उपस्थित होते.



