चोपडी ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच मंगलताई सरगर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी संपन्न झाली. या ग्रामसभेमध्ये अनेक विषयावर व विकासाच्या मुद्द्यावर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.
या ग्रामसभामध्ये माजी उपसरपंच ज्ञानेश्वर भानुदास बाबर यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. एक अनुभवी, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्ञानेश्वर बाबर हे सर्वांना परिचित आहेत .त्यांनी यापूर्वी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी चांगले काम केल्याने त्यांची पुन्हा एकदा तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड केल्याने त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
या ग्रामसभेसाठी उपसरपंच पोपट यादव ,सोसायटीचे चेअरमन भिकाजी बाबर ,चेअरमन दगडू बाबर, आर. एस. बाबर सर, ग्रामपंचायत सदस्य दिनेश बाबर ग्रामपंचायत सदस्य प्रशांत डोंगरे, ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र मिसाळ, तलाठी एस. के. जाधव, आरोग्य सेविका टी.आर.गेजगे.,चंद्रकांत बाबर फौजी, बाळासाहेब बाबर फौजी, महादेव वाघमारे फौजी , कृषीमित्र बाळासाहेब बाबर ,यांच्यासह ग्रामस्थ व युवकवर्ग उपस्थित होते.
या ग्रामसभेत बांबू लागवड ,घरकुल योजना, मतदारावर यादी वाचन, सिद्धनाथ मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा याबाबत चर्चा करण्यात आली. समाजकल्याण व महिला बालकल्याण योजनांची माहिती देण्यात आली. यासह अनेक विषयावर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला. शेवटी उपस्थितांचे आभार ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र मिसाळ यांनी मानले.