बलवडी ता . सांगोला येथील हर्षवर्धन धनाजी शिंदे याचे गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सावर्डे ता. चिपळूण येथे अपघाती निधन झाले.मृत्यूप्रसंगी त्याचे वय वर्षे 21 होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी शिंदे यांचा तो नातू होता.
त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. त्याचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता बलवडी येथे होईल अशी नातेवाईकांनी सांगितले. निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.