महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी मेडशिंगी गाव कडकडीत बंद ठेवून दिला पाठिंबा 

मेडशिंगी ( प्रशांत पाटील ) मेडशिंगी ता. सांगोला या गावाने सर्व समाज एकत्र येऊन व सर्व पक्षाच्या वतीने मुंबई येथे आझाद  मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवीत संपूर्ण गाव बंद ठेवून पाठिंबा दर्शविला.
मुंबईतील आझाद मैदानावर मा. मनोज जंरागे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या संदर्भात उपोषण सुरू आहे. लाखो मराठा मुंबईमध्ये आझाद मैदानावर आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनामध्ये मेडशिंगी गावांमधून अनेक मराठी बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. तसेच मेडशिंगी येथील सर्व पक्षीय व सर्व समाज बांधव व व्यापारी बंधूंनी एकत्र येऊन एक दिवसीय संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवण्याचे जाहीर केले व गाव  बंद ठेवून या मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला.
यावेळी मेडशिंगी गावचे सरपंच प्रतापसिंह इंगवले सर, पोलीस पाटील संतोष इंगवले तसेच गणेश इंगवले, प्रदीप इंगवले, अक्षय चव्हाण, सुधीर शिंदे, रावसाहेब शिंदे, अनिल रुपनर, अतुल पाटील, उमेश इंगवले, स्वप्नील इंगवले इत्यादी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button