सांगोला (वार्ताहर) कै.गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या स्मृती समारोहानिमित्त निरंतर ४३व्या वर्षीही आयोजित पुरुषांच्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धांना शनिवार, दि. ३१ ऑगस्टच्या सायंकाळ सत्रात रंगत आणली ती सीनियर प्लेयर्सचा सहभाग असणाऱ्या ‘सोलापूर मास्टर्स’ आणि ‘सांगली मास्टर्स’च्या रोमहर्षक सामन्याने.
या दोन्ही संघांमध्ये सहभागी खेळाडू हे कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती बास्केटबॉल स्पर्धांमध्ये जवळपास गेली २५ ते ३० वर्षांपासून खेळाडू ते संयोजन समिती या रूपात कार्यरत असून या मैदानांची त्यांचे घट्ट असलेले नाते आणखी दृढ होण्यासाठी संयोजन समितीने गेट-टुगेदर च्या रूपात या खेळाडूंना एकत्र करण्यासाठी सर्वांशी संपर्क साधत सामना खेळण्याचे आवाहन केले होते.
या सामन्यातील विजयी संघास झपके परिवारातर्फे विशेष ट्रॉफी व प्रत्येक खेळाडूच्या सन्मानार्थ मेडल देण्यात येणार असून सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम प्रेक्षकांनी उत्साहपूर्ण वातावरणात केले तर सामन्याला आपल्या बहारदार समालोचनाने इर्शाद बागवान यांनी रंगत आणली. या सामन्यामध्ये खालील खेळाडूंनी सहभाग घेतला.
सोलापूर मास्टर्स प्रशांत मस्के,राजेंद्र नारायणकर,नितीन चपळगावकर,चारुदत्त जगताप,राजेंद्र गुळमिरे,अख्तर मणेरी,अनिल जाधव
डॉ. महेश ढेंबरे,राहुल दिवटे,प्रा. डॉ. जमीर सय्यद,विनोद गोस्वामी, प्रशिक्षक डी के पाटील
सांगली मास्टर्स-प्रसन्न कर्वे,डॉ.संतोष कुलकर्णी,शरद नागणे,डॉ.शरद बनसोडे,प्रा.संजय पाटील,उपेंद्र कुलकर्णी,उमेश जाधव,राजकुमार छाचवाले,मोहन पाटील,मयूर बापट