फिनिक्स प्री प्रायमरी स्कूल मध्ये वार्षिक शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न –

फिनिक्स प्री प्रायमरी स्कूल नाझरे वार्षिक शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ठीक 9:00 वाजता एकलव्य कोचिंग क्लासेस चे संस्थापक डॉ.श्री. कन्हैया सोनवणे यांनी गाडीचे पूजन केले व गाडी नाझरे गावातून प्रथम भीमाशंकर मंदिर भिवघाट चे दर्शन केले. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मंदिराचे महात्म्य सांगून मुलांना खाऊ वाटप केला. नंतर तेथून भिवघाट ते आरवडे या ठिकाणी प्रस्थान झाली. प्रथम आरवडे मध्ये श्री राधा कृष्ण मंदिर दर्शन घेतले आणि तेथील प्रसादाचा आस्वाद घेतला. तसेच राधाकृष्ण म्युझियम विद्यार्थ्यांना दाखवून तेथील माहिती सांगितली

 

तसेच विद्यार्थ्यांनी भोजन करून शुक्राचार्य कडे गाडी प्रस्थान झाली. शुक्राचार्य महाराजांचे व महादेव मंदिराचे दर्शन घेऊन गाडी बानूर गडाकडे प्रस्थान झाली. तेथील बानू लिंग हे जुने शिव पुराण महादेवाचे मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर मुलांसमवेत पालक आणि पाल्य यांचे विविध गाण्यावर डान्स घेण्यात आले. तसेच विद्यार्थी व पालक सहलीला नेण्याचा उद्देश हा की पालकांनी मुलांबरोबर सहलीचा आस्वाद घ्यावा हा होता. म्हणून आगळीवेगळी पालक विद्यार्थी अशी सहल काढण्यात आली होती.

बाणूरगडा वर या सर्व गोष्टींचा आस्वाद घेतल्यानंतर तेथून गाडी नाझरे गावाला रवाना झाली. ठीक 6.00 वाजता गाडी फिनिक्स प्री प्रायमरी नाझरे स्कूल मध्ये सुखरूपपणे पोहोच झाली.

 

ही शैक्षणिक सहल पार पाडण्यासाठी फिनिक्स प्री प्रायमरी च्या संस्थापिका डॉ ऐश्वर्या सोनवणे मुख्याध्यापिका सौ. सोनाली सरगर मॅडम, सहशिक्षिका- सौ. काजल आलदर मॅडम, शिपाई- सौ.शुभांगी रायपुरे तसेच पालक वर्ग- पूजा शिंदे, रेखा रजपूत, सरस्वती बंडगर, सीमा परदेशी, संगीता माने, श्री रविराज गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button