समूहगीत गायन स्पर्धा फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात संपन्न

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सहोदय कॉम्प्लेक्स सोलापूर समूह गीतगायन स्पर्धा उत्कृष्टरित्या संपन्न झाली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे चे प्राचार्य श्री दास सर,कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे , स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील, ए. ओ वर्षा कोळेकर, परीक्षक डॉ. आनंद धर्माधिकारी, प्रा. संदीप तावरे (संगीत अलंकार) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे लाभले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

ही गीतगायन स्पर्धा दोन गटांमध्ये संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये  पंधरा गट सहभागी झाले होते सीबीएसई स्कूल मधील पंधरा गटातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांचे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. सहोदय कॉम्प्लेक्स च्या थीमनुसार सीबीएसई स्कूल मधील विद्यार्थ्यांची कौशल्ये एकत्रित वाढवूया याची प्रचिती विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गाण्यातून सादर केली. अ गटामध्ये प्रथम क्रमांक सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी, द्वितीय क्रमांक फॅबटेक पब्लिक स्कूल सांगोला, तृतीय क्रमांक सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर व अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर यांनी पटकवला. तर ब गटामध्ये प्रथम क्रमांक सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी, द्वितीय क्रमांक विश्वशांती गुरुकुल पंढरपूर, तृतीय क्रमांक अरिहंत पब्लिक स्कूल पंढरपूर व फॅबटेक पब्लिक स्कूल सांगोला यांनी पटकावला. सहोदय कॉम्प्लेक्स सोलापूर यांच्यावतीने फॅबटेक पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचा समूह गीतगायन स्पर्धा उत्कृष्टरित्या यशस्वी केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी स्कूलचे संगीत शिक्षक डॉ. अमोल रणदिवे, नृत्य शिक्षक आतिश बनसोडे चित्रकला शिक्षक अविनाश जावीर यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मृणाल राऊत यांनी केले. तर आभार  किरण कोडक यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button