सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

महूद येथे गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडल्याबद्दल या मंडळांचा सत्कार

 डॉल्बी व डीजे मुक्त गणेश विसर्जन मिरवणुका हे आमच्या समोरील उद्दिष्ट होते.यासाठी महूद ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभल्याने महूद येथे डॉल्बी व डीजेला आळा घालण्यास पोलीस प्रशासनाला यश आले आहे.डॉल्बी व डीजे मुक्त मिरवणुका ही लोक चळवळ होणे आवश्यक आहे,असे विचार सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी महूद येथे बोलताना व्यक्त केले.
नुकत्याच संपन्न झालेल्या गणेशोत्सवामध्ये महूद येथील काही जबाबदार गणेश मंडळांनी डॉल्बी व डीजे सारख्या वाद्यांचा वापर न करता पारंपारिक वाद्यांच्या साह्याने गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडल्याबद्दल या मंडळांचा सत्कार पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.महूद येथील मारुती मंदिरामध्ये झालेल्या या कार्यक्रमात येथील गुरुदेव प्रसारक गणेशोत्सव मंडळ,जयहिंद गणेश तरुण मंडळ,जयभवानी गणेश तरुण मंडळ या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन श्री.कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तसेच आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक जयंती निमित्ताने या जयंती उत्सव कमिटीने ही डॉल्बी व डीजे या वाद्यांचा वापर न करता पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढली होती. त्याबद्दल या उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.या कार्यक्रमास उद्योगपती चंद्रशेखर ताटे,माजी उपसरपंच दिलीप नागणे व,डॉ. शरद नागणे,सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार,केदारनाथ भरमशेट्टी, कैलास ढवणे,ग्रामपंचायत सदस्य यशवंत खबाले,संजय चव्हाण,महेंद्र बाजारे,अंगद जाधव,दीपक चव्हाण, ॲड्.विजय धोकटे,जयवंतराव नागणे,भाजपाचे नवनाथ भोसले,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभिषेक कांबळे, उमेश पाटील,कैलास खबाले,रुपेश देशमुख,पोलीस पाटील प्रभाकर कांबळे,दीपक धोकटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी पुढे म्हणाले की,धार्मिक सण उत्सवांचे पावित्र्य राखणे सर्वांचीच जबाबदारी आहे.उत्सवाच्या माध्यमातून उत्साह वाढल्याने मरगळ झटकली जाते.मात्र सध्या अशा उत्सवाच्या माध्यमातून उन्माद पाहावयास मिळतो आहे.समाजाच्या सर्वच स्तरातून अशा गोष्टींना विरोध होणे आवश्यक आहे. नागरिक हे सुद्धा साध्या वेषातील पोलीसच आहेत.कोणत्याही समाज विघातक गोष्टींना पायबंध घालण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे.महूद येथील हा उपक्रम समाजाला व उत्सव मंडळांना दिशा देणारा आहे असेही श्री.कुलकर्णी यावेळी म्हणाले.या कार्यक्रमांमध्ये डॉ.शरद नागणे,उमेश महाजन यांनीही विचार व्यक्त केले.या कार्यक्रमास राहुल देशमुख, बाळू तांबोळी,राहुल जाधव,गणेश पळसे,प्रतीक ताटे,अजित गांधी,मयूर उंबरदंड,अशोक गुरव,बाबुराव नागणे, धीरज जाधव ,यल्लाप्पा तेलंग,डॉ. देशमुख,अविनाश साळुंखे,आकाश शिंदे, दीपक नागणे,अतुल कांबळे,प्रताप नागणे,लक्ष्मण कांबळे,अजय नागणे, महेश नागणे,सचिन आसबे,प्रजय नागणे,शशिकांत आसबे,ओंकार धोकटे, सचिन नागणे,ओंकार लवटे,ओंकार ठिगळे,मुकुंद देशमुख,आप्पा सरक, सोहेल जमादार यांच्यासह विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!