नाझरे प्रतिनिधी:- या जगात गुरुशिवाय दुसरे दैवत नाही, आणि म्हणून भजन, पूजन, सेवा गुरु बरोबरच करावा हाच उद्देश ठेवून नाझरे ता. सांगोला येथे श्रावण मासानिमित्त शिव दिंडी सोहळ्याची सांगता डॉ.धारेश्वर महास्वामीच्या हस्ते महादेव मंदिर येथे करण्यात आली.
यावेळी पायी हळूहळू चाला, मुखाने शंभू महादेव बोला, धारेश्वर बोला, माऊली, माऊली गुरुराज माऊली, लई आगळा जगावेगळा धारेश्वर महास्वामींचा लागला लळा, धावत आलो स्वामी तुमच्या पाया, वेडा झालो, वेडा झालो, वेडी याच्या गावा गेलो या भजनाने शिवभक्तांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.