सांगोला (उत्तम चौगुले) :-घेरडी गावचे सुपुत्र हवालदार बिराप्पा तानाजी पुकळे यांनी भारतीय सेनेमध्ये बावीस वर्षे देशसेवा देऊन मायदेशी सुखरूप परत आले निमित्त ग्रामस्थ घेरडी पुकळे परिवार आणि माजी सैनिक यांचे वतीने नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
श्री बिराप्पा तानाजी पुकळे यांनी भारतीय सेनेमध्ये 22 वर्षे देशसेवा भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी केली ते सुखरूप मायदेशी परतले त्यानिमित्त घेरडी ग्रामस्थ पुकळे परिवार आणि माजी सैनिक यांच्यावतीने सत्कार समारंभाचे आयोजन घेरडी येथे करण्यात आले होते सदर सत्कार समारंभ मध्ये पुकळे परिवाराच्यावतीने सर्व माजी सैनिकांचा येतोचित सत्कार करण्यात आला.तसेच सदर प्रसंगी कीर्तन ही आयोजित केले गेले होते.
माजी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोला यांचे वतीने सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्या साठी प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला मासिक मिटींगचे आयोजन करण्यात येते. सदर प्रसंगी हवालदार बिराप्पा तानाजी पोकळे यांचाही सपत्नीक सत्कार माजी सैनिक गेस्ट हाऊस सांगोला येथे माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे .
माजी सैनिकाने संघटित राहावे आणि सामाजिक कार्यात भाग घ्यावा जसे सैन्यात असताना आपण कोणत्याही कामाचा निर्णयाप्रमाणे कार्य संपवतो तसेच सामाजिक कार्यामध्ये संघटित राहून समाज हित जपावे असे विचार मनोगतामध्ये व्यक्त करण्यात आले.