श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेत दिनांक १ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक विजयकुमार जगताप सर होते. अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तद्नंतर प्रशालेतील सहशिक्षक श्री.बी.डी.भोसले यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती सांगितली. तसेच सहशिक्षक श्री. सुनील लिगाडे यांनीही अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील लिगाडे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार श्री.नामदेव हजारे यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते