महूद येथील जितेंद्र बाजार यांनी बनविले जनावरांसाठी पीपीई किट

कोरोना महामारीत ‘पीपीई किट’ मुळे अक्षरश: चिलखतीप्रमाणे संरक्षण मिळालं. पीपीई किटमुळे लाखो-करोडोंचे जीव वाचले. पीपीई किटचा प्रयोग आता जनावरांमध्ये आलेल्या लंम्पी महामारीच्या काळात लाखमोलाचे पशुधन वाचविण्यासाठी करण्यात आला असून  शेतकरी सुपुत्र आणि गारमेंट व्यावसायिक जितेंद्र बाजारे यांनी चार महिन्यांच्या संशोधनातून जनावरांसाठीच्या पीपीई किटची निर्मिती केली आहे. जे किट मुख्य लंम्पीसह अन्य संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी उपयोगी ठरताहेत.

महूदच्या जितेंद्र बाजारे या शेतकरी सुपुत्राने जनावरांसाठीच्या पीपीई किटचा बहुधा देशातीलच नव्हे, तर जगातील पहिला भन्नाट प्रयोग यशस्वी केला आहे. ज्यातून लाखमोलाच्या पशुधनाचा जीव वाचतोय अन् शेतकर्‍यांचं होणारं लाखोचं नुकसान टळतंय. अस्मानी अन् सुलतानी संकटाशी झुंजणार्‍याबळिराजला जिवापाड जपलेलं पशुधन वाचविण्यासाठी या किटच्या माध्यमातून दिलासा मिळतोय. हे किट पशुधनाच्यादृष्टीने सुरक्षा कवच ठरतेय.

श्री. बाजारे यांनी वेगवेगळ्या जनावरांसाठी पीपीई किट बाजारात विक्रीसाठी आणली आहेत. जास्तीत जास्त किटचे उत्पादन करून पशुधन वाचविण्यासाठी बाजारे परिवाराची अहोरात्र धडपड सुरु आहे. श्री. बाजारे यांनी तयार केलेल्या किटची अनेक पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी चाचणी घेऊन लंम्पीच्या बचावासाठी ते योग्य असल्याचा शेरा मारून पशुपालकांनी आपल्या जनावरांसाठी अशी किट्स वापरावीत असे शिफारसदेखील ते करताहेत. अशा किटस्च्या वापरातून सांगोला तालुक्यासह अन्य काही ठिकाणचे लाखो किंमतीचे पशुधन वाचत असल्याची माहिती शेतकर्यांकडून दिली जातेय.

जनावरांसाठी तयार करण्यात आलेल्या पीपीई किटसाठी लॅमिनेटेड ओवन कपड्याचा वापर करण्यात आलाय. पीपीई किट जनावराच्या अंगावर चढविल्यानंतर डास किंवा माशीचा दंश जनावराच्या थेट शरिरापर्यंत पोचू शकत नाही. परिणामी दंशाअभावी जनावर बाधित होऊ शकत नाही.
मुकी जनावरे लंम्पीच्या महामारीतून वाचली पाहिजेत, यासाठी तीन साईजमध्ये पीपी-ई कीट तयार करण्याचं काम बाजरे परिवाराकडून साधारण 15 मजूरांना घेऊन अहोरात्र सुरु आहे. परिवारीतील एमबीए पदवीप्राप्त प्रतिक तांत्रिक यांची मदत करताहेत. फॅशन डिझायनर कल्याणी हिचे डिझाईन करण्यात तर उत्पादन करुन करून घेण्यात भाग्यश्री बाजारे यांचे योगदान आहे. अकलूज प्रोफेसर विष्णू सुर्वे यांचे देखील खूप मोठे पाठबळ लाभत आहे. किटची संपूर्ण फर्म जितेंद्र बाजारे हे हाताळत आहेत.

कोरोना महामारीच्या काळातील पीपीई किटबद्दल पंतप्रधान मोदी यांनी व्यक्तीश: फोन करुन माझे कौतुक केले होते. कोरोनात देशभरात पीपीई किट पाठविली. अशी कीट बनविणारी महूदची भक्ती गारमेंट ही देशातील ग्रामीण भागातील पहिली कंपनी ठरली होती. पशुधनासाठी तयार केलेले पीपीई किट लंम्पींवर प्रभावी ठरत आहे. शेतकर्यांना माफक दरात हे कीट देत आहेत. या किटला पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आमच्याकडून सरकारने कीट खरेदी करुन ते शेतकर्यांना मोफत किंवा अत्यंत माफक दरात द्यावे.
– जितेंद्र बाजारे, पीपीई किटस निर्माते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button