सांगोला तालुकाक्राईम

अज्ञात चोरट्याने पळविल्या साठ हजार रुपये किमतीच्या दोन पाड्या व तीन शेळ्या

सांगोला (तालुका प्रतिनिधी) अज्ञात चोरट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून जर्सी गाईच्या दोन पाड्या व तीन शेळ्या असा सुमारे साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्याची घटना शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास शिवणे ता. सांगोला व वासुद ता. सांगोला येथे घडली आहे.

पांडुरंग राजाराम होवाळ रा. वाकी शिवणे ता. सांगोला हे शेती व्यवसायास पुरक म्हणुन गोपालन करतात त्यांचेकडे दोन लहान जर्सीीं पाडी व एक शेळी शेतातील गोठयात बांधल्या होत्या होवाळ यांचे जावई बापु वामन मोरे रा. वाकी हे शनिवार दि.१४ रोजी जनावरांचा गोठा साफ करण्यासाठी शेतातील गोठ्यावर गेला असता त्यांना तेथे दोन्ही पाड्या व शेळी दिसुन आली नाही त्यामुळे त्याने लागलीच पांडूरंग होवाळ यांना सदरची माहीती सांगितली त्यामुळे लागलीच पांडूरंग होवाळ व मुलगा अनिल यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता गोठ्याच्या पाठीमागील बाजुस असणारा दरवाजा उघडा दिसला व दोन्ही जर्सी पाड्यांचा व शेळीचा आजुबाजुस परिसरात शोध घेतला परंतु त्या मिळुन आल्या नाहीत त्यामुळे त्यांची खात्री झाली की दोन पाड्या व एक शेळी ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत

 

.दरम्यान होवाळ हे सांगोला पोलिसात तक्रार देण्यासाठी आले असता त्यांना माहीती मिळाली की वासुद ता.सांगोला येथील बाळासाहेब भिमराव सावंत यांच्याही दोन शेळ्या रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या आहेत याबाबत पांडूरंग होवाळ यांनी दोन जर्सी पाड्या व शेळ्या चोरुन नेल्या बाबत अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!