आ.शहाजीबापूंच्या पत्राची दखल, मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाली मदत; कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सहा लाखांच्या धनादेशाचे वाटप

कटफळ येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते कटफळ येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

मंगळवार १८ जून २०२४ रोजी पंढरपूर- कराड रोडवरील चिकमहूद जवळ (बंडगरवाडी) पाटी येथे रोजंदारीने कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कटफळ गावासह तालुक्यावर शोककळा पसरली. या अपघातात आश्विनी शंकर सोनार, इंदुबाई बाबा इरकर, शिरमाबाई लक्ष्मण जाधव, कमल यल्लाप्पा बंडगर, सुलोचना रामा भोसले, मनीषा आदिनाथ पंडित सर्वजण रा. कटफळ ता.सांगोला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आमदार शहाजीबापू पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची तसेच जखमी महिलेच्या उपचारासाठी २५ हजार रुपयांची व्यक्तिगत मदत दिली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून बाब म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मुख्यमंत्री सचिवालयाचे सहसचिव कैलास बिलोणीकर यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून कटफळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या होत्या. शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते कटफळ येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी बी.आर.माळी, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी प्रशांत जाधव, परमेश्वर हाके, दत्ता बंडगर, अंबादास हांडे, जेजीनाथ धंगेकर, अजित भिंगे, तानाजी हांडे, विकास खरात आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button