खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. चार मध्ये महायुतीची प्रचार फेरी संपन्न

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय (आठवले गट), रासप, रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारानिमित सांगोला शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये होम-टू-होम प्रचार फेरी संपन्न झाली. माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी व पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी सांगोला नगरपरिषदेचे मा. नगरसेवक तथा गटनेते आनंदा माने, भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद बाबर, मा. नगरसेवक अस्मिर तांबोळी, मा. नगरसेवक माऊली तेली, मा. नगरसेवक सोमेश यावलकर, सूर्यकांत मेटकरी, प्रभाकर घोंगडे, राजेश खडतरे, सचिन शिर्के, काशिलिंग गावडे, भाजप शहराध्यक्ष प्रविण जानकर, शिवाजी गावडे, मानस कमलापूरकर, देविदास गावडे, आशपाक मुलानी, राहुल गेजगे, बिरा खांडेकर, महेश कदम, पवन सपाटे, प्रसाद जिरगे, रवी पवार, संतोष देवडकर, रोहित पवार, रोहित गेजगे, सुमित भोसले, राहुल सुतार, राहुल दिवटे, लखन पवार, निशिकांत तेली, दत्तात्रय तेली, ज्ञानेश्वर गाडेकर, अजिंक्य माने, प्रीतेश सादिगले आदी उपस्थित होते.