सांगोला विद्यामंदिर प्राचार्यपदी अमोल गायकवाड यांची नियुक्ती

सांगोला ( प्रतिनिधी ) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला प्राचार्य गंगाधर घोंगडे यांचे सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या प्राचार्य पदावर नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड यांची नियुक्ती झाली.
सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला.व प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर संस्थाअध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी माजी प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपप्राचार्य शहिदा सय्यद व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्राचार्य गायकवाड यांनी १५ जून २००७ पासून सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे ६ वर्षे सहशिक्षक,१ जून २०१३ ते ३० जून २०२० पर्यंत सात वर्षे कोळा विद्यामंदिर कोळा येथे प्राचार्य व १ जूलै २०२० ते ३१ मे २०२४ नाझरा विद्यामंदिर नाझरा येथे चार वर्ष प्राचार्यपदी सेवा केली. आपल्या अध्यापनातून व प्रशासकीय कार्यातून तसेच इतर शैक्षणिक कार्यातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला त्यामुळेच त्यांना सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ व परिवर्तन सामाजिक संस्था पुणे कडून आदर्श मुख्याध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
या नियुक्तीसाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नूतन प्राचार्य अमोल गायकवाड यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्य सेनानी कै. गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांचे विचार व तत्व याला प्रमाण मानून शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीपथावर असलेल्या सांगोला विद्यामंदिरमध्ये प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल मला मनस्वी आनंद आहे. यापुढेही संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव म.शं. घोंगडे सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके व सर्व संस्थाकार्यकारणी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्यपदी कार्य करताना विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व रचनात्मक विकासाबरोबरच शाळेच्या उन्नतीसाठी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असणार आहे..
*अमोल गायकवाड*
*नूतन प्राचार्य सांगोला विद्यामंदिर*



