नाझरा विद्यामंदिरच्या प्राचार्यपदी बिभीषन माने यांची नियुक्ती

*
नाझरा(वार्ताहार):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यपदी बिभीषन माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पदभार स्वीकृती कार्यक्रमाच्या पूर्वी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन सांगोला विद्यामंदिर चे नूतन प्राचार्य अमोल गायकवाड व नाझरा विद्यामंदिरचे नूतन प्राचार्य बिभीषण माने यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन यथोचित सन्मान करून प्राचार्य पदाच्या खुर्चीवरती माने यांना बसवण्यात आले.यावेळी संस्था कार्यकारणी सदस्य शीलाकाकी झपके, सांगोला विद्यामंदिर चे माजी प्राचार्य गंगाधर घोंगडे,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, विनायक पाटील ज्येष्ठ लिपिक विवेक घोंगडे, उत्तम सोनलकर, सुनील भोरे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्था अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके व नवनियुक्त प्राचार्य माने यांचा नाझरा येथील खंडागळे परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना संस्था अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके म्हणाले की,नाझरा विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांच्या उत्कर्षासाठी माने यांनी प्रयत्नशील राहावे,यापूर्वी असणारा गुणवत्तेचा वाढता आलेख असाच वाढत ठेवावा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहावे. श्री माने यांनी यापूर्वी कोळा विद्यामंदिर प्रशाला कोळा या ठिकाणी इंग्रजी विषयाचे अध्यापन केले असून सांगोला विद्यामंदिर या ठिकाणी पर्यवेक्षक पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांनी मांडले.