सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुपने जल्लोषात साजरा केला सरकारी वाढदिवस

सांगोला – सांगोला विद्यामंदिर रिटायर्ड ग्रुप हा हौशी व उत्साही सदस्याचा ग्रुप असल्याने यातील सदस्य नवनवीन उपक्रम घेत असतात.त्याचाच एक भाग म्हणून या ग्रुपचे प्रतोद प्रा. राजाभाऊ ठोंबरे गेल्या दोन वर्षापासून सदस्यांचा सरकारी वाढदिवस साजरा करीत आहेत.त्यानुसार ज्यांची जन्मतारीख एक जून आहे अशा सदस्यांचा वाढदिवस हॉटेल जयनिला या ठिकाणी केक कापून संगीताच्या तालावर साजरा करण्यात आला.
सेवानिवृत्त प्राचार्य भीमाशंकर पैलवान,बाळासाहेब वाघमारे,नारायण विसापुरे,प्रा.तायाप्पा आदट,लक्ष्मण विधाते,अमर गुळमिरे ,कमलाकर महामुनी,पांडुरंग भुईटे या आठ जणानी केक कापून सरकारी वाढदिवस साजरा केला.या प्रसंगी संजीव नाकील,नागनाथ गयाळी ,प्रा.राजाभाऊ ठोंबरे,सुधाकर म्हेत्रे हे अन्य सदस्य उपस्थित होते.सहभोजन,मासिक स्नेहभोजन,गुरू पौ्णिमा,कोजागिरी पौर्णिमा, वनभोजन,हुरडा पार्टी असे उपक्रम राबवून ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात हे पाहून अनेकांनी या ग्रूपचे व उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.