जवळा गाव 100% कडकडीत बंद;स्व.सरपंच संतोष देशमुख व स्व.सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा केला तीव्र शब्दात निषेध.

जवळा(वार्ताहर) बीड येथील मस्साजोग गावचे लोकप्रिय सरपंच स्व.संतोष अण्णा देशमुख तसेच स्व.सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली.या प्रकरणातील सर्व आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी जवळा गाव 100% कडकडीत बंद ठेवून निषेध करण्यात आला. या बंदमध्ये भाजी मंडई तसेच व्यापार पेठ व्यापारांनी बंद ठेवून निषेध व्यक्त केला.
यावेळी जवळा गावातील छत्रपती संभाजीराजे चौक ते संपूर्ण गावातून स्व.संतोष देशमुख यांच्या प्रतिमेसह मूक मोर्चा काढण्यात आला.हा मूक मोर्चा पुढे ग्रामपंचायत कार्यालय येथे आल्यानंतर सकल मराठा समाज बांधव व सर्व बहुजन समाज बांधवांनी सरपंच श्री.सज्जन मागाडे व ग्रामपंचायत अधिकारी श्री.रसाळ भाऊसाहेब यांना याबाबतचे निवेदन दिले.
यावेळी सरपंच श्री.सज्जन मागाडे,पत्रकार श्री.कैलास गोरे,श्री. विकास गावडे,श्री.नारायण सावंत,श्री.गजानन नवत्रे यांनी आपल्या मनोगतातून सर्व आरोपींना लवकरात लवकर कठोर अशी शिक्षा करण्यात आली पाहिजे देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळावा अशी भावना व्यक्त केली. सदर निवेदन देते प्रसंगी उपसरपंच श्री. नवाज खलिफा,ग्रामपंचायत सदस्य,सकल मराठा समाज बांधव तसेच सर्व बहुजन समाज बांधव,उपस्थित होते.