sangolamaharashtrapolitical

कडलास ग्रामस्थांसह डॉ.बाबासाहेब देशमुख उतरले रस्त्यावर; 15 जून पर्यंत रस्त्याचे काम करण्याचे लेखी आश्वासन

सांगोला कडलास रोडच्या रखडलेल्या रस्त्याचे कामासंदर्भात रास्ता रोको संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला येथील सांगोला कडलास रोड नदी पुलाजवळील बरेच वर्ष रखडलेल्या रस्त्याचे काम अद्यापही  अपूर्ण असल्याने व याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने सदरच्या रखडलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता काल समस्त कडलास ग्रामस्थ यांच्यावतीने शनिवार दि.1 जून रोजी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कडलास ग्रामस्थांसह डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी स्वत: रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

 

याप्रसंगी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेकाप नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी करत संबंधीत विभागाच्या कामकाजाविषयी तीव्र संताप व्यक्त केला. त्यावेळी संबंधित विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी 15 जून 2024 पर्यंत रस्त्यांचे काम करु असे लेखी दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

सदर रास्ता रोको प्रसंगी दत्ताभाऊ टापरे ,दत्ताभाऊ जाधव, सरपंच दिगंबर भजनावळे, शेतकरी सहकारी सूतगिरणीचे व्हा.चेअरमन अ‍ॅड.नितीन गव्हाणे, समाधान पवार,राहुल गायकवाड , संभाजी साळुंखे, संजय गायकवाड, पांडूरंग भजनावळे, अशोक ठोकळे, केशव गायकवाड, ताजू इनामदार यांच्यासह कडलास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!