एस. टी. चा ७६ वा वर्धापन दिन सांगोल्यात उत्साहात साजरा

सांगोला ( प्रतिनिधी )- सांगोला बस स्थानकामध्ये एस.टी.चा ७६ वा वर्धापन दिन केक कापून व प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
एस.टी.च्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त सांगोला बस स्थानकावर विद्युत रोषणाई करून बसस्थानक सजवण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त काढलेली भली मोठी रांगोळी प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर व अधिकाऱ्यांच्या हस्ते एस.टी.चे पूजन करण्यात आले. आगार व्यवस्थापक विकास पोकळे यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केल्यानंतर वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी एस.टी. मधून सेवानिवृत्त झालेल्या रमेश शिवगोंडा पाटील, रमेश संभाजी चंदनशिवे, निवृत्ती शंकर ईरकर, गोरक जालिंदर कळकुंबे, सुब्राव मनोहर सरवदे, राजकमार ज्ञानोबा गवळी, नागनाथ विठोबा केदार,नाना सोपान काशिद, बाबासाहेब शिवराम वलेकर या ९ कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पत्रकार नागेश जोशी यांनी एस. टी. च्या आजपर्यंतच्या वाटचालीचा इतिहास सांगुन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, डॉ. अनिल कांबळे, अरविंद केदार, डॉ. मानस कमलापूरकर, सहा.कार्यशाळा अधीक्षक पृथ्वीराज पारसे, वाहतूक निरीक्षक सागर कदम, वाहतूक नियंत्रक उत्तम बुरुंगळे, वरिष्ठ लिपिक प्रताप टकले, लिपिक संतोष ढोले, लिपिक आशिष सूर्यवंशी आदी उपस्थित होते.