नाझरे येथे श्री गणेशाचे मोठ्या उत्साहात स्वागत

नाझरे ता. सांगोला येथे श्री गणेशाचे मोठ्या उत्साहात व ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी शंकर चौक तरुण मंडळाच्या श्रीच्या आगमनास गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महाराज यांनी उपस्थित राहून सर्व गणेश भक्तांना आशीर्वाद दिला. यावेळी महास्वामींचे स्वागत प्रसाद स्वामी व संदेश चौगुले यांनी केले. तसेच श्री ची महापूजा सौ व श्री नंदकुमार चौगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
राज योगी तरुण मंडळाच्या श्री ची महापूजा युवा नेते यश राजे साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी यश राजे यांचे स्वागत माजी प्राचार्य प्रकाश परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर संग्राम चौक तरुण मंडळाची श्रीची महापूजा सौ व श्री शिवाजी माने यांच्या शुभहस्ते तर माऊली चौक तरुण मंडळाची श्रीची महापूजा स्वप्निल गुरव यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी उपसरपंच सुवर्णा पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी असंख्य गणेश भक्त हजर होते.