.
शिवणे वार्ताहर-सांगोला येथील क्रीडा संकुल येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत शिवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने आपल्या खेळाची परंपरा कायम ठेवत यावर्षी ही चमकदार कामगिरी केली असून प्रशाळेचा 19 वर्षे मुलींच्या संघाने अव्वल स्थान पटकावले आहे.तसेच 14 वर्षे मुलांच्या संघाने तालुक्यात 2 रा क्रमांक पटकाविला आहे.
या दोन्ही संघास क्रीडा शिक्षक श्री. काशीलिंग शेळके, हेमंत रायगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील दोन्ही संघाचे आणि मार्गदर्शकांचे संस्था अध्यक्ष बबनराव जानकर, उपाध्यक्ष प्रकाशभाऊ वाघमोडे,सचिव डॉ.राजेंद्र जानकर सर्व संचालक मंडळ तसेच विजयकुमार वाघमोडे व सर्व स्टाफ यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विजयी संघाचे शिवणे ग्रामस्थ आणि परिसरातून कौतुक होत आहे.