सांगोला (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या सराफ व्यावसायातील मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी यांची स्वतंत्र गुणवत्ता हेच अलंकारिक दागिन्यांचे अधिष्ठान असल्याचे प्रतिपादन सांगोला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी व्यक्त केले आहे. मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी यांच्या सांगोला शाखेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभ व गुणवंतांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक खणदाळे हे बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्यातील नामांकित आरोग्य तज्ञ डॉ पियुषदादा साळुंखे-पाटील हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नियोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना या व्यावसायिक दालनाचे सर्वेसर्वा जयदीप रत्नपारखी यांनी सांगितले की, व्यावसायिक दृष्टिकोनाच्या पलीकडे संवेदनशील मानवतेचा धर्म जपत असताना समाजशील भावनेने आपली सामाजिक बांधिलकी विविध उपक्रमांच्या माध्यमातून पूर्ण करणे हे आमच्या व्यवसायाचे परम कर्तव्य असल्याचे आम्ही मानतो. गुणात्मक आणि दर्जात्मक अलंकारिक मालाची ओळख असणाऱ्या मे.गजानन रामचंद्र रत्नपारखी या सुवर्णपेढीवर सांगोला करांनी अगदी भरभरून प्रेम देत आम्हाला तीन वर्षात व्यावसायाच्या रूपाने येथील मातीशी आणि मातीतील माणसांशी आपुलकीचे आणि स्नेहाचे नाते निर्माण करता आले याचा मनस्वी आनंदाने खूप मोठे समाधान आहे.
या कार्यक्रमावेळी कला, क्रीडा व नवनियुक्त प्रशासकीय गुणवंतांचा मे गजानन रामचंद्र रत्नपारखी, शाखा सांगोला यांच्या वतीने यथोचित सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यात आली. त्यामध्ये सायली धुळा सरक, अनुराधा पवार व संग्राम विश्वासराव काशीद यांची राज्य व राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या संघात निवड, सुजाता श्रीकांत बाबर यांची राज्यस्तरीय उंच उडी स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाची कमाई तसेच राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेसाठी विद्यापीठ संघामध्ये निवड झालेले अजित कोळेकर, प्रशांत गाडेकर,अजय मिसाळ दशरथ रुपनर, नेहा केसकर, प्रशांत जाधव, आकाश कदम त्याचबरोबर कोमल संभाजी जोध यांची बी. एस्ससी अंतर्गत विद्यापीठामध्ये गणित विषयांमध्ये सर्वप्रथम, स्वाती सतीश कोडग यांनी एमस्सी मध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे, शिवशंकर यशवंत खरात यांना बेस्ट एनसीसी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे, राजलक्ष्मी राजाराम केदार यांनी बेस्ट एनसीसी स्टुडन्ट तसेच टीसीएस कंपनीमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे, गुलामे मुस्तफा इकबाल मुजावर यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सहभाग नोंदवला, जहीर सलीम शेख यांनी अश्वमेध व पश्चिम विभाग बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड, अभिजीत रघुनाथ शिंदे यांची मिरज येथे एमबीबीएस साठी निवड, साहिल जाधव यांनी डिप्लोमा मध्ये उत्कृष्ट यश संपादन केले आहे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच तालुक्यातील क्रीडा विश्वाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र झटणारे ज्येष्ठ क्रीडा समीक्षक विजय पवार यांचा क्रीडा क्षेत्रासाठी दिलेले समर्पक सेवाभावी कार्य अधोरेखित करण्यासाठी सन्मानाच्या रूपाने सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.साळुंखे पाटील यांनी आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करत असताना सांगितले की, दशकानुदशके सराफ व्यवसाय मध्ये असणाऱ्या मे गजानन रामचंद्र रत्नपारखी यांनी नेहमीच ग्राहकांशी आपली नाळ घट्ट ठेवून त्यांच्याप्रती असणारी विश्वासहर्ता विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आणखी भक्कम केली आहे. सांगोला तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी दिलेली सेवा आणि मालाची गुणवत्ता यांच्या जोरावर हे दालन येणाऱ्या काळामध्ये मोठी उंची गाठेल असा विश्वास आणि शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमासाठी मालक सौरभ रत्नपारखी,ऋतुराज रत्नपारखी,अरविंद केदार, सुनिल गायकवाड,शशिकांत गायकवाड,राजेंद्र सूर्यवंशी ,रमेश देशपांडे काका , बाळासाहेब शिंदे,तसेच यशवंत विद्यार्थीचे पालक, मार्गदर्शक हितचिंतक व इतर नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमोल शेजाळ यांनी व्यक्त केले.