सांगोला :- फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजन व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर व कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे यांनी केली .
गुणवत्ता , जबाबदारी व विद्यार्थ्याप्रती असणारी मदतीची भावना हि आदर्श शिक्षकाची गुणे आहेत . असे आदर्श शिक्षक देश घडवू शकतात असे विचार कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे यांनी मांडले. व शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
डीन अँकँडमीक डॉ. शरद पवार, यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, ज्यांच्याकडून आपण चांगल्या गोष्टी शिकण्याचा व आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो त्यास शिक्षक म्हणण्यास हरकत नाही, त्यामुळे चांगल्या गोष्टी शिकवणारा शिक्षकी पेशा हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारा पेशा असल्याने विद्यार्थ्यांचे व पर्यायाने देशाचे भविष्य घडविणारा समाजातील बहुमूल्य पेशा असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी फॅबटेक पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले , आय.क़्यु ए सी. चे डॉ.वागीशा माथाडा व सर्व विभाग प्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर साहेब व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमोल मेटकरी , ग्रंथपाल प्रा.सुधीर माळी, ग्रंथपाल प्रा. मोहन लिगाडे , यांनी मोलाचे सहकार्य केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन फार्मसी चे प्रा.अमोल पोरे यांनी केले .