नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजची माजी विद्यार्थिनी साक्षी विनायक पाटील हिने ऑल इंडिया वैद्यकीय प्रवेश परीक्षेत 657 गुण मिळवून उज्वल यश संपादन केले होते.
नुकताच तिचा सोलापूर येथील डॉ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश निश्चित झाला आहे.तिचे पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिणके या ठिकाणी झाले असून पाचवी ते दहावीचे माध्यमिक शिक्षण नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नाझरा या ठिकाणी झाले आहे. तिने आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात 19 वा क्रमांक पटकावला होता.विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतून तिने यश मिळवले होते.त्याचबरोबर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ही तिने यश संपादन केले आहे.
जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिने नीट परीक्षांमध्ये 657 मार्क मिळवल्याने तिचा शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. चिणके गावचे माध्यमिक शिक्षक व सध्या नाझरा विद्यामंदिर प्रशालाचे गणित विषयाचे शिक्षक विनायक दत्तु पाटील यांची ती सुकन्या आहे.सदर यशाबद्दल संपूर्ण सांगोला तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे.तिच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.