सामाजिक प्रबोधनपर देखावा व बहारदार नृत्यगजरात विद्यामंदिर परिवाराच्या गणरायाचे आगमन

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला च्या ‘श्री गणेशा’चे आगमन उत्साही वातावरणातील मिरवणुकीने करण्यात आले.

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या निवासस्थानापासून गणरायाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. संस्थासदस्य सौ.व श्री.प्रफुल्लचंद्र झपके साहेब यांच्या शुभहस्ते ‘श्रीं’ च्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी झपके कुटुंबियांसह संस्था सदस्य चंद्रशेखर अंकलगी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी अमोल महिमकर, सचिन बुंजकर व सहकार्यांनी मार्गदर्शन केलेल्या आकर्षक वेशभूषेतील विद्यार्थ्यांच्या टिपरी व लेझीम नृत्य प्रकारांनी सांगोलकरांना भूरळ पाडली.प्रशांत रायचुरे व सहकाऱ्यांनी दिग्दर्शित केलेल्या नारीशक्तीच्या सजीव देखाव्यातून विद्यार्थ्यांनी समाजातील भीषण वास्तवता सादर करत नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव जागृती करण्याचा सुंदर प्रयत्न केला.

मिरवणुकीमध्ये सुरूवातीस प्रशालेचा झेंडा, फलक, बँडपथक, शिस्तबद्ध एन.सी.सी. कॅडेट्स, गणवेशातील स्काउट्स व गाईड्स तसेच आर.एस.पी.चे विद्यार्थी आणि घोषणा देत मोठ्या संख्येने उपस्थित असणारे इयत्ता पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी यांच्यामुळे मिरवणुकीला शोभा आली.
संस्थापक अध्यक्ष परमपूज्य कै.गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्राचे प्रभारी मुख्याध्यापक उदय बोत्रे यांच्या शुभहस्ते पुष्पहार समर्पित करून पूजन करण्यात आले.

‘श्रीं’ च्या प्रतिष्ठापनेची पूजा प्राचार्य अमोल गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, उपमुख्याध्यापिका सौ.शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे, सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.सुकेशनी सोंडकर उपस्थित होते.

यावेळी सर्व मान्यवर,शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला.मिरवणूक शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी मिरवणूक विभाग प्रमुख शिवाजी चौगुले, प्रा.सुहास काळेल, उत्सव विभाग प्रमुख बाळराजे सावंत, प्रा.तानसिंग माळी यांच्यासह सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय, सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल येथील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button