दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांवर यंदा बक्षीसांचा पाऊस पडणार आहे आणि स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला हमखास आकर्षक बक्षीस मिळणार आहे अशी माहिती डॉ सौ नेहा साळुंखे पाटील यांनी दिली.
पर्यावरण पूरक गौरी गणपती, बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, सेल्फ डिफेन्स, महिला सक्षमीकरण, वीर जवान तुझे सलाम आणि शक्तीपीठ सजावट हे या स्पर्धेचे विषय असतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिलांनी आपल्या घरातील गौरी गणपतीचे तीन फोटो आणि तीन मिनिटांचा व्हिडिओ 8999713872, 8263050544 आणि 9022478028 या क्रमांकावर पाठवणे आवश्यक आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या ५ स्पर्धकांना ५ आकर्षक पैठणी मिळणार आहेत. तर द्वितीय क्रमांकाच्या १० विजेत्या स्पर्धकांना १० मिक्सर मिळणार आहेत. तृतीय क्रमांकाच्या १५ महिला स्पर्धकांना १५ कुकर मिळणार आहेत. पाचव्या क्रमांकाच्या २५ विजेत्या स्पर्धकांना २५ हॉटपॉट मिळणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुक्रवार १३ सप्टेंबर रोजी सायं. ५ पूर्वी आपल्या घरगुती गौरी गणपती सजावटी चे फोटो आणि व्हिडिओ वरील मोबाईल क्रमांकावर पाठवणे बंधनकारक राहील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षीस मिळणार असल्याने सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. सौ. नेहा साळुंखे पाटील यांनी केले.