नंदेश्वर येथील औदुंबर कुंभार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील झारेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक औदुंबर भगवान कुंभार यांना शिक्षणविभाग पंचायत समिती मंगळवेढा यांचे मार्फत सन २०२४ करीता दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी मंगळवेढा येथे आ.समाधान आवताडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी बी.ए.रणदिवे, यांच्यासह शिवसेनेचे तालुका अध्यक्ष (शिंदे गट) पै.अशोक चौंडे,चेअरमन बंडू करे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी मोटे, दिगंबर गरंडे,सतिश लेंडवे, अण्णासाहेब पाटील,वडील भगवान कुंभार,आई मुक्ताबाई कुंभार,ऋषी कुंभार,पोपट बंडगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



