राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यास दिवसेंदिवस प्रतिसाद वाढू लागला आहे. वाकी घे. ता. सांगोला येथे मुसळधार पावसातही हजारो नागरिकांनी दिपकआबांच्या गावभेट दौऱ्यास उपस्थिती दर्शवत दिपकआबांचे वाकी गावात जंगी स्वागत केले.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजत गाजत फुलांची उधळण करून आणि शेकडो महिलांनी औक्षण करून आपल्या लाडक्या नेत्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाकी घे गावात दिपकआबा साळुंखे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी वाकी घे गावातील सरपंच अर्चना शिंदे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब शिंदे, रफिक शेख डॉ पुण्यवंत निमंग्रे, तुकाराम घेरडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
रविवार दि ८ सप्टेंबर रोजी दीपकआबा दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाकी गावच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्यावर होते. वाकी गावातील मारुती मंदिर, बुद्धविहार, शिंदेवस्ती, खांडेकरवस्ती माळी दाईगडे वस्ती निमग्रेवाडी दिवसे पवार वस्ती या परिसरातील शेकडो नागरिकांशी संवाद साधला. वाकी घे परिसरातील नागरिकांच्या रस्ते, पाणी, वीज, आणि आरोग्य या विषयी अडचणी जाणून घेतल्या आणि जागेवरूनच सबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करून वाकी घेरडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. वाकी घेरडी परिसरातील नागरिकांच्या अडचणी जागेवरून निपटारा केल्याने या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.