पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स शाखा सांगोल्याचा ५ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न…

५ वर्षांपूर्वी म्हणजे ८ सप्टेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असणारे पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स या नामवंत कंपनीचे शाखा सांगोला येथे सुरु झाली.

अल्पावधीतच सांगोला तालुक्यासह आटपाडी,मंगळवेढा,पंढरपूर व जत तालुक्यामध्ये पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स शाखा सांगोल्याचे नाव असंख्य व्हरायटी, चोख व्यवहार व तत्पर सेवा यामुळे प्रसिद्ध झाले.ग्राहकांच्या पसंती व विश्वासामुळे सांगोला शाखेला ५ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण झाले.या निमित्त सांगोला शाखेच्या ५ व्या वर्धापनदिनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे माजी प्राचार्य सौ.व श्री.भीमाशंकर पैलवान सर, सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे प्राचार्य सौ.व श्री.अमोल गायकवाड सर व सांगोला विद्यामंदिर जुनिअर कॉलेज चे शिक्षक सौ.व श्री.शिवशंकर तटाळे सर व सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे शिक्षक सौ.व श्री.प्रशांत रायचुरे सर आणि सौ.व श्री. गणेश घेरडीकर सर या मान्यवरांच्या हस्ते केक कापून करण्यात आला.या कार्यक्रमास उपस्तिथ मान्यवरांना पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स शाखा सांगोला यांच्या तर्फे भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमास पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स शाखा सांगोला यांचेकडून संचालक प्रा.पी.सी.झपके सर, श्री.विलास क्षिरसागर, श्री.विश्वेश झपके आणि श्री.मयूर क्षिरसागर व सर्व स्टाफ उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button