गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आदित्य भोसले व वैष्णवी इंगोले प्रथम

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी, देशभक्त, कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजची वैष्णवी इंगोले हिने ८ वी ते १० वी गटामध्ये व आदित्य भोसले याने ज्युनिअर कॉलेज इ.११ वी १२ वी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभामध्ये रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व‌ झपके कुटुंबीयांकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके व स्पर्धेचे उद्घाटक व परीक्षक हरिदास रणदिवे,प्रा.तुकाराम मस्के, सोमनाथ ढोले ,डॉ.सचिन लादे ,दीपक इरकल ,सुनील जगताप,फारूक काझी,पतंगराव बाबर,बापूसो भंडगे, प्रसाद लोखंडे, राजेश्वरी कोरे-महिमकर, सरला खाडे-शिर्के,प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद,उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे उपस्थित होते.

या स्पर्धेच्या सुरुवातीला उद्घाटन हरिदास रणदिवे व स्पर्धक विद्यार्थ्यांच्या हस्ते कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पात्रता फेरी व अंतिम फेरी या स्वरूपात ही स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेमध्ये ११ वी १२ गटामध्ये आदित्य आप्पासाहेब भोसले सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला प्रथम क्रमांक, ऐश्वर्या पांडुरंग कोळेकर कोळा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज कोळा द्वितीय क्रमाक, राजकन्या अमोल भडकवाड कै.शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर तृतीय क्रमांक, सृष्टी सुनिल लिगाडे सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला चौथा क्रमांक,वेदिका शिवाजी टकले आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज करकंब पाचवा क्रमाक तर इ.८ वी ते १० वी गटामध्ये वैष्णवी कुंडलिक इंगोले सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला प्रथम,वर्षा विलास गावडे श्रीम.निर्मलाताई ठोकळ प्रशाला दक्षिण सोलापूर द्वितीय क्रमांक,आशिष प्रकाश पाटील नूतन मराठी विद्यालय मंगळवेढा तृतीय क्रमांक, समृद्धी विष्णू माळी न्यु इंग्लिश स्कूल सांगोला चौथा क्रमांक,साक्षी विजय बाबर नाझरा विद्यामंदिर प्रशाला नाझरा पाचवा क्रमांक असे यश संपादन केले‌. या यशस्वी विद्यार्थ्यांचा रोख रक्कम स्वरूपात बक्षिस,सन्मानपत्र व झपके कुटुंबीयांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व परीक्षक यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. परीक्षक प्रा. तुकाराम मस्के व डॉ. सचिन लादे यांनी नाकाल जाहीर केला.

या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर परिवारातील पर्यवक्षक सुरेश मस्तुद,प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्पर्धक विद्यार्थी,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये प्राचार्य अमोल गायकवाड यांनी स्पर्धेच्या संयोजनाबाबत पालकांचे व स्पर्धकांचे अभिप्राय आम्हाला प्रोत्साहित करणारे आहे,निखळता ही या स्पर्धेची खास बाब आहे. म्हणूनच या वक्तृत्व स्पर्धा यशस्वीपणे राबवत आहोत असे सांगत उपस्थितांचे स्वागत केले. परीक्षक सत्कार निवेदन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद यांनी केले.

————————————————————

साधी राहणी व उच्च विचारसरणी अंगीकारून जे माणदेशीचे महात्मा गांधी झाले अशा गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. वक्तृत्व म्हणजे मन लावून ऐकणं.बोलणं म्हणजे नुसतं पोपटपंची नव्हे. जो अंतरंगातून आपले विचार मांडतो तो खरा वक्ता असतो. वक्तृत्व स्पर्धेतून याच प्रशालेची विद्यार्थिनी शितल पाटील ही सध्या सुधा मूर्ती यांच्या इन्फोसिस कंपनीमध्ये काम करते आहे. वक्तृत्वाची कला गेली हजारो वर्षापासून जोपासली गेली आहे. वक्तृत्व हे अंतरंगातून यावे यासाठी वाचनाची नितांत आवश्यकता आहे. या सांगोल्याच्या स्पर्धेच्या माध्यमातून असंख्य वक्ते तयार होतील असा विश्वास वाटतो.
उद्घाटक हरिदास रणदिवे

———————————————————–
स्पर्धेत बऱ्याच विद्यार्थिनी होत्या खरंतर विद्यार्थ्यांनीही बोलायला पुढे यायला पाहिजे.वक्तृत्व ही आपली ओळख निर्माण झाली पाहिजे.तुमच्या सद्गुणांचं प्रकटीकरणा म्हणजे वक्तृत्व आहे.वक्तृत्व कला संपूर्ण जीवनाला कलाटणी देऊ शकते. वाचनाची उणीव सध्या भासत आहे, ज्यांना वक्तृत्व स्पर्धेतून स्वतःला सिद्ध करायचे आहे.त्यांनी रोज किमान एक तास तरी वाचले पाहिजे. पुस्तक हे शहाण्या माणसाच्या हातात पडलं की त्या पुस्तकातले शब्द खऱ्या अर्थाने सार्थ ठरतात. जपानी भाषेतील एका म्हणीप्रमाणे इथून पुढे ८०% जेवण करण्याचा नवा संकल्प करा.
प्रा.तुकाराम मस्के

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button