भारत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून विविध स्पर्धांचे आयोजन

सांगोला : सांगोला शहरातील जुन्या व नामांकित मंडळ असलेल्या भारत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळाचे यंदाचे हीरक महोत्सवी ६० वे वर्ष असून मंडळाने यंदाच्या वर्षी १५ फुटी उंच सुबक व नयनरम्य अशी देखणी सिंहासनावर बसलेली आणलेली आहे. सन १९६५ मध्ये स्थापना झालेल्या या सार्वजनिक मंडळाचे सांगोला मध्ये मोठे नाव असून मुंबईचा गणपती सांगोल्यात आणून शहरातील गणपती सांगोला सारख्या ग्रामीण भागातील लोकांना पाहता यावे याकरिता या मंडळाने आजपर्यंत अनेक मोठमोठ्या गणपतीच्या सुबक व नयनरम्य मुर्त्या, सजावट, समाज प्रबोधनात्मक सजीव देखावे , थर्माकोलचे म्हैसूर पॅलेस करून सांगोलकरांना मुंबईसारख्या शहरातील मोठ्या गणपतीचा देखावा आजपर्यंत सादर केलेला आहे. मंडळाच्या वतीने आजपर्यंत गेल्या ६० वर्षात अनेक लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले असून मोफत सर्व रोग निदान शिबिर, मोफत नेत्ररोग शिबीर, महिला भजन स्पर्धा, होम मिनिस्टर, रांगोळी स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप तसेच मनोरंजनाच्या दृष्टीने पूर्वीच्या काळामध्ये पडद्यावरती चित्रपट मंडळाच्या वतीने दाखवण्यात आलेले होते.

मंडळाला आजपर्यंत महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्था, पोलीस स्टेशनचे पुरस्कार व अनेक सन्मान मिळालेले आहेत. अलीकडच्या काळात मराठी पाऊल पडते पुढे, महाराष्ट्राची लोकधारा, लावण्यखणी यासारखे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम देखील मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहेत. जुन्या काळात रेल्वेने येणारा गणपती म्हणून ख्याती असलेला भारत गल्ली मंडळाचे वैशिष्ट्य होते. पूर्वीच्या काळामध्ये रेल्वेने मुंबईने कुर्डूवाडी पर्यंत गणपती येऊन तिथून कुईवाडीतून बार्शी लाईट रेल्वेने सांगोल्याला छोट्या गाडीतून रेल्वेने हा गणपती सांगोल्याचा स्टेशन वरती यायचा त्या काळातील अबाल वृद्ध लहान मुले तसेच सांगोला शहरवासीय सांगोल्याच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन भारत गल्लीचा गणपती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे. मुंबईहून गणपती आणून परगावी बाहेर जाऊन चांगल्या व सुबक मुर्त्या उंच आणण्याची प्रथा सांगोल्यात पहिल्यांदा भारत गल्ली गणेशोत्सव मित्र मंडळाने केले असल्याने या मंडळाचे सुबक व देखणी व उंच मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची नेहमीच गर्दी असते. ६० वर्षा पासून मुंबईहून सुबक व नयनरम्य मुर्ती आणण्याची परंपरा मंडळाने अविरतपणे अगदी कोरोना काळात देखील कायम ठेवली आहे.

 

मंडळाचे यंदाचे हीरक महोत्सवी ६० वे वर्षा निमित्त मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असून बुधवार दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता घरगुती गौरी सजावट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून सदरची स्पर्धा स्पर्धकाच्या घरी जाऊन परीक्षण करून घेण्यात येणार आहे. गुरूवार दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या रंगभरण स्पर्धेमध्ये मंडळाच्या वतीने चित्र काढलेला कागद देण्यात येणार असून त्या चित्रावर रंग भरून दयाचे आहेत. शनिवार दि. १४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी तीन वाजता महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. वरील सर्व स्पर्धा करिता प्रथम क्रमांक २००१/-रूपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक १५०१/-रूपये व व ट्रॉफी, तृतीय क्रमांक १००१/-रुपये व ट्रॉफी, उत्तेजनार्थ ५०१/- व ट्रॉफी देण्यात येणार आहे. सर्व बक्षिसांना ट्रॉफी स्व.मारुती शिवाजी सोनवणे (पत्रकार) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणार आहे. वरील स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना सहभागाकरिता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धा या मंडळाच्या मंडपामध्येच होणार आहेत. वरील सर्व स्पर्धांसाठी नांव नोंदणीसाठी तृप्ती पेंशन, अण्णाभाऊ साठे पुतळ्याखाली, शहर पोलीस चौकी जवळ, सांगोला या ठिकाणी नोंदवावी, तसेच अधिक माहितीसाठी मो.नं. ७२४९२९१०४४, ९०२८५९१४३१,९९७०८३११५५ वावरती संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे. तसेच रविवार दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता मोफत नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले असून यामध्ये पूर्णतः डोळ्याची तपासणी मोफत करून मिळणार आहे व त्यावर उपचार सल्ला देखील मोफत देण्यात येणार आहे.

 

सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ठीक १२ वाजता मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे देखील देण्यात येणार आहे. मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वरील सर्व स्पर्धा व कार्यक्रमाचा लाभ सांगोला शहरवासीयांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button