सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय :आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला:- 2019 साली आमदार झाल्यापासून पाच वर्षाच्या काळात तालुक्यातील शेती सिंचनासाठी विविध योजना ,रस्ते ,पाणी, वीज, समाजमंदिरे, मंदिरे, सभामंडप यासह इतर अनेक कामासाठी सातत्याने पाठपुरावा, नियोजन व कामे पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाच वर्षाच्या काळात 5 हजार कोटी रुपये विकास निधी आणला असून सांगोला तालुक्याचा परिपूर्ण विकास करणे हेच माझे ध्येय आहे. तालुका सुजलाम सुफलाम करणे, तरुणांच्या हाताला रोजगार व शेती सिंचनाच्या व पाण्याच्या अपूर्ण योजना पूर्ण करणे यासाठी सांगोला तालुक्यासह चोपडी गावातील ग्रामस्थांनी आशीर्वाद द्यावेत. आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा आमदारकीची संधी द्यावी .संधीचे सोने करून तालुक्याचा , कायापालट करण्याचे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी चोपडी येथे दिले.

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आमदार निधीतून सांगोला तालुक्यातील चोपडी येथे श्री. सिद्धनाथ मंदिराशेजारी सभामंडप बांधकामासाठी 10 लाख रुपये निधी दिला .येदुचामळा येथील गणेश मंदिरासमोर सभामंडपासाठी 10 लाख रुपये निधी व श्री हनुमान गणेश तरुण मंडळाचे 10 लाख , या निधीतून 40 बाय 40 आकाराचा भव्य सभामंडप उभारला .या दोन्ही सभामंडपाचे उद्घाटन, व लोकार्पण सोहळा आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमादरम्यान आमदार शहाजीबापू पाटील यांनी चोपडी गावात सुरू असलेल्या शिवस्मारकासाठी 2 लाख 51 हजार रुपये व येदूचामळा येथे गणेशमंदिर सुशोभीकरण व पेविंग ब्लॉकसाठी साठी 10 लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले.

 

बापूंनी चोपडी गावातील रस्ते , मंदिराची कामे व बुद्धिहाळ तलावाचा टेंभू योजनेत समावेश करुन वर्षातून चार वेळा तलावात पाणी सोडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन बुद्धीहाळ तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न कायमचा सोडवला आहे. तसेच तालुक्यातील नद्यांना कालव्याचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कामे मार्गी लावली. दुष्काळी सांगोला तालुका हा कलंक पुसण्याचे मोठे काम केले आहे. तालुक्यातील नागरिकांना सुखी व समाधानी ठेवणे हे आपले उद्दिष्ट आहे. नागरिकांनी कामे सांगावी कामे करण्यास मी थकणार नाही. आजपर्यंत अनेक विकासकामे मार्गी लावली असून उर्वरित विकास कामे करण्यासाठी सर्वांचे आशीर्वाद महत्त्वाचे ठरणार आहेत.

येदूचामळा येथील गणेश मंदिरासाठी स्वर्गीय टी. जी. बाबर सर यांनी चार गुंठे जागा बक्षीसपत्र करून दिली .त्याबद्दल श्री हनुमान गणेश तरुण मंडळ , येदुचामळा यांच्यावतीने आभार मानण्यात येत असून लवकरच त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.
श्री सिद्धनाथ मंदिर समितीच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा आर .बी.बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व श्री हनुमान गणेश तरुण मंडळाच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री .हनुमान गणेश तरुण मंडळ येदुचामळा मंडळाचे मार्गदर्शक चेअरमन दगडू गोविंद बाबर, अध्यक्ष दगडू वसंत बाबर, ग्रामपंचायत सदस्य अनिल आप्पासो जगदाळे, खजिनदार श्रीकांत दादासो बुरुंगे, पत्रकार रविराज शेटे या मान्यवरांचा आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आर. एस. बाबर यांनी प्रास्ताविकात चोपडी गावासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलेला निधी व केलेली विकास कामे याचे कौतुक करीत भविष्यात बापूंच्या पाठीशी चोपडी गाव उभे राहील असे आश्वासन दिले. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी चोपडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच राजाबाई सदाशिव बाबर यांच्या निवासस्थानी भेट दिली.
या कार्यक्रमासाठी राघुशेठ बाबर, आर .एस.बाबर, अभियंता एल. बी .केंगार, श्रीमंत सरगर ,चेअरमन भिकाजी बाबर ,सचिन खळगे, ग्रामपंचायत सदस्य अनिल जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य दिनेश बाबर ,रामचंद्र बाबर ,सुरेश बाबर, सतीश पाटील, पोपट बाबर ,आप्पासाहेब बाबर, लालासो जगदाळे, मारुती वराडे, विकास जगदाळे, भारत बाबर, अमोल बाबर, खंडू वराडे, चंद्रशेखर बाबर, यांच्यासह युवावर्ग, ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या, संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बाबर यांनी केले. चेअरमन दगडू बाबर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
बातमीला फोटो आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button