*न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये गणेशोत्सवानिमित्त आयोजित “शब्दांचे फटकारे” या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद*

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये आज गणेशोत्सवानिमित्त “शब्दांचे फटकारे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी डॉ. गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर, संस्था सदस्य प्रा अशोकराव शिंदे,प्रा दिपकराव खटकाळे, प्रा.जयंतराव जानकर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाचे प्राचार्य प्रा केशव माने, उप प्राचार्य प्रा संतोष जाधव,पर्यवेक्षक श्री दशरथ जाधव सर,पर्यवेक्षक श्री तानाजी सूर्य गंध सर,श्री तातोबा इमडे सर, संस्कृतीक विभाग प्रमुख प्रा मिलिंद पवार, सौ स्मिता इंगोले मॅडम, न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवानिमित्त आयोजित *”शब्दांचे फटकरे”* या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी श्री बाबासाहेब कोकरे सर होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे प्राचार्य प्रा. केशव माने व उपप्राचार्य प्रा संतोष जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनपर मनोगता मध्ये बोलताना श्री बाबासाहेब कोकरे यांनी शब्दांचे फटकारे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजनात्मक प्रबोधन केले. सामाजिक आशय भेदकपणे व्यक्त करणारी करणाऱ्या कविता, अशा अनेकविध कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात खळखळून हसून दाद दिली.
“शब्दांचे फटकारे” या कार्यक्रमाने कवी श्री बाबासाहेब कोकरे यांनी विद्यार्थ्यांची वाहवा मिळवली. शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा उपक्रम स्तुत्य आहे. यापूर्वी त्यांनी हजारो शाळेमधून असे उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. तसेच त्यांना या कार्यक्रमाबद्दल विविध सामाजिक संस्था कडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा.अरुण बेहेरे सर यांनी करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष राजगुरू यांनी केले, तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा मिलिंद पवार यांनी मानले.