आमदार शहाजीबापू पाटील यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी दररोज उपस्थित राहण्याच्या केल्या सूचना

सांगोला तालुक्यातील नाझरे येथे पोलीस औटपोस्ट असून या कार्यालयाच्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या सवडीनुसार केव्हातरी उपस्थित असतात. या पोलीस औटपोस्ट कार्यक्षेत्रात परिसरातील दहा ते बारा गावचा समावेश आहे .या भागात सध्या हवेत उडणारे ड्रोन व चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून या ठिकाणच्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्याकडून याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही. अशा तक्रारी या भागातील नागरिकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे केलेल्या आहेत. आमदार शहाजी बापू पाटील हे चोपडी येथे एका कार्यक्रमासाठी आले असता नागरिकांनी त्यांच्याकडे आपल्या समस्या व तक्रारी मांडल्या.
या तक्रारीची दखल घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांना नाझरा येथे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना कराव्यात व जनतेला दिलासा द्यावा अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. सध्या गणेश उत्सवाचा कालावधी असून अनेक लोकांना या उत्सवाचा आनंद घेता येत नाही कारण या परिसरातील नागरिक सध्या चोरट्यांच्या भीतीने भयभीत झाले आहेत.तरी पोलीस प्रशासनाने नाझरा येथे आपली यंत्रणा कार्यान्वित ठेवावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
नाझरा येथे शुक्रवारी बाजार दिवस असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे या व इतर समस्या बाबत नागरिकांनी कोणाकडे तक्रार करावी असा प्रश्न पडतो. अशावेळी नाझरा येथील पोलीस औटपोस्ट असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. तरी यामध्ये बदल करावेत व या परिसरातील गावांमध्ये पोलीस गस्त ठेवल्यास नागरिक भयमुक्त होतील. अशी मागणी या परिसरातील जनतेमधून होत आहे