सांगोला तालुक्यातील कोळा येथील रवींद्र वस्त्रनिकेतन शाखा कोळे येथे लाडकी बहीण रक्षाबंधन सेल व लकी ड्रॉ कुपन कार्यक्रम उत्साहात झाला. रवींद्र वस्त्रनिकेतन येथे ३ हजार ५०० रुपये कपडे खरेदीवर खास लाडकी बहीण रक्षाबंधन सेल व लकी ड्रॉ कुपन ठेवले होते. या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यामध्ये रक्षाबंधन सेल खरेदी खास बक्षिसे ठेवली होता. लहान मुलांच्या हस्ते लकी ड्रॉ कुपन काढले. यामध्ये तीन भाग्यवान विजेतेची निवड केली. प्रथम विजेते सुनिता कुलकर्णी कोळे द्वितीय विजेते सोनाली सरगर कोंबडवाडी तृतीय विजेते नीता सरगर कोळे होते. भाग्यवान महिलांना पैठणी साडी कोळा गावचे माजी सरपंच सिताराम सरगर, उपसरपंच सादिक पटेल, पत्रकार जगदीश कुलकर्णी, माजी प्राचार्य सूर्यकांत घोडके, कोंडीबा कोळेकर बुवा,कारभारी आलदर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ रवींद्र वस्त्र निकेतन चा सर्व स्टाफ मोठ्या संख्येने व व्यवस्थापक सागर सुतार व ग्राहक उपस्थित होते.