सांगोला तालुक्यातील कोळा मोडा वस्ती येथे आदर्श गणेश मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेशाच्या आरतीचा मान सांगोल्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भीमराव खनदाळे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी परिसरातील नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक भीमराव खनदाळे म्हणाले कोळ्या सारख्या ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर वसलेल्या या आदर्श गणेश मित्र मंडळाच्या श्री गणेशाच्या आरतीचा मान मिळाला मी माझं भाग्य समजतो गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ‘ श्री गणेशाय नम: ‘ म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे. गणाचा धिश गणपती आहे आपण अग्र पूजेचा मान देत असतो ग्रामीण भागातील लोक खूप मेहनती आहेत प्रगतीचे नवनवीन शिखरे गाठू शकले आहेत या वस्तीवरील परिसरातील युवक पोलीस एमएसएफ सुरक्षा दलात जास्त प्रमाणात असल्याने मला अभिमान वाटला आता शिक्षण घेत असलेल्या नवीन युवकांनी यांचा आदर्श घ्यावा येणाऱ्या काळात युवकांनी उच्च शिक्षण घ्यावं यामध्ये वैद्यकीय क्षेत्र इंजिनियर असेल वकील स्पर्धा परीक्षा म्हणून वेगवेगळ्या प्रशासकीय सेवेमध्ये मुलांनी पुढे यावं असं मला वाटतं मुलींनीही मागे राहू नये या भागातील महिलांना विनंती करतो मुलींना भरपूर शिकवा कमी वयात लग्न करू नका लग्नाचा विचार लगेच करू नका मुली आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत पालकांनी मुलींना शिक्षणाची संधी दिली तर मुली मोठ्या प्रमाणात पुढे येऊ शकतात विविध क्षेत्रांमध्ये पुढे जातात पालकांनी त्यांना जेवढे शक्य होईल तेवढे उच्च शिक्षण देणे गरजेचे आहे गणेश उत्सव शांततेत पार पाडा पोलिसांना सहकार्य करा असे शेवटी पोलीस निरीक्षक भिमराव खनदाळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास कोळा पोलीस आऊट पोस्टचे एपीआय चंद्रकांत पुजारी, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तुकाराम दादा आलदर पुढारी,पत्रकार जगदीश कुलकर्णी, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब करांडे, संस्थापक दीपक माने, समाजसेवक ज्ञानेश्वर खंडागळे, श्रीमंत करांडे, सचिन करांडे, विठ्ठल आलदर, शिवाजी करांडे, सुभाष करांडे, बापू करांडे यांच्यासह आदी मान्यवर ग्रामस्थ नागरिक लहान मुले महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस निरीक्षक भिमराव खनदाळे यांचा सत्कार बाळासाहेब करांडे कोळा बीटचे नूतन एपीआय चंद्रकांत पुजारी ज्येष्ठ नेते तुकाराम आलदर पत्रकार जगदीश कुलकर्णी यांचा सत्कार मंडळाचे वतीने संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साईनाथ नाईंनवाड गुरुजी आभार विठ्ठल आलदर यांनी मानले.