सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील लोणविरे फाटा येथे झालेल्या अपघातात 31 वर्षीय युवकाचा जखमी होवून दुदैर्वी मृत्यू झाला असल्याची घटना दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2.50 वाचे सुमारास घडली.
अपघातामध्ये मोटार सायकलवरील शाम काशीद (वय 31 वर्षे, रा मोरगाव ता कवठेमहांकाळ जि सांगली) हे अपघातात जखमी होवुन मयत झाला आहे. फिर्याद ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी पुजा साळे यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास पोना नलवडे हे करीत आहेत.