महाराष्ट्र
फॅबटेक पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी साजरा केला अनोखा बालदिन

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये अनोख्या पद्धतीने बालदिन साजरा करून विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्य निर्माण केली. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये बालदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील, ए.ओ. वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ वनिता बाबर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री संजय देशमुख उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्कूलचे शिक्षक श्री दयानंद चांडोले सरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा केली होती. तसेच पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सेनानींच्या व विविध प्रकारच्या वेशभूषा सुंदर पद्धतीने सादर करून रॅम्प वॉक केला. स्कूलचे शिक्षक श्री अभिनंदन टाकळे सर व सौ रमिजा मुलाणी यांनी चाचा नेहरू यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. यानंतर स्कूल मधील सर्व महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी कुरकुरे से कुर्रम हे बालगीत सादर केले.
प्रशालेतील डान्स टीचर श्री आतिश बनसोडे व मृणाल राऊत यांनी वेस्टर्न आणि कथ्थक या नृत्य प्रकारची जुगलबंदी सादर केली. त्यानंतर म्युझिक सर डॉ .अमोल रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी एक विनोदी शालेय प्रहसन सादर केले. या लघूनाटीकेतून शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणाची गुणवत्ता, याविषयी माहिती विद्यार्थ्यांसमोर सादर केली. विद्यार्थ्यांनी या विनोदी नाटकाचा मनसोक्त आनंद लुटला. यानंतर डान्स टीचर श्री अतिश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील महिला शिक्षकांनी सुंदर रिमिक्स सादर केले. बाल दिनानिमित्त फॅबटेक पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षकांनी विविध प्रकारच्या शालेय भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांच्या मनात बाल दिनाचा उत्साह वाढवला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनीषा शिंदे यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.