सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व विद्यामंदिर परिवाराचे मार्गदर्शक प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी सूर्योदय फाउंडेशन सांगोला या संस्थेच्या वतीने सूर्योदय जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यामंदिर परिवार प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध शैक्षणिक उपक्रम राबवत गुणवत्ता आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचा ध्यास घेऊन गुणवत्ता विकास कार्यक्रमांचे यशस्वी नियोजन करत आहे.त्यामुळे दिवसेंदिवस सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा गुणवत्तेचा आलेख उंचावत आहे या संपूर्ण कार्याची दखल घेत सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने सूर्योदय जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामीण साहित्यिक कवी इंद्रजित भालेराव यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दि.१४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता आनंद लॉन्स वासुद रोड, सांगोला येथे सन्मान गुरूजनांचा या समारंभामध्ये जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.