न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सांगोला चे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत वर्चस्व अबाधित.
नुकत्याच पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये 17 वर्षे, 19 वर्ष वयोगटातील मुलांनी व 19 वर्ष वयोगटातील मुलींनी प्रथम क्रमांक मिळवत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतील वर्चस्व अबाधित ठेवले आहे. या सर्व स्पर्धा क्रीडा संकुल सांगोला येथे पार पडल्या.
या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा हिम्मतराव साळुंखे, श्री सचिन हजारे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख, संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर, सर्व संस्था सदस्य, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे प्राचार्य प्रा केशव माने, उपप्राचार्य प्रा संतोष जाधव, उपमुख्याध्यापक प्रा संजय शिंगाडे,श्री.तानाजी सूर्यगंध सर, पर्यवेक्षक श्री. दशरथ जाधव सर, पर्यवेक्षक श्री. तातोबा इमडे सर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमधील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.