संत सद्गुरू बाळुमामा यांची पालखी सोहळा वझरे ता. सांगोला येथील शेतमालक सुभाष कोकरे, कोकरे वस्ती येथे मुक्कामी असून, रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत विक्रम जगताप मेजर, बाळूमामा मालिका फेम रामण्णा यांची कीर्तन सेवा आयोजित केली आहे तसेच यावेळी महाआरती होईल. तसेच सदरची पालखी क्रमांक 17 नंबर असून, कारभारी लहू दादा लेंगरे, उपकारभारी समाधान नरळे तर पुजारी बाळू लेंगरे हे काम पाहत आहेत.
सत्ता दररोज बाळूमामाची महाआरती, ओव्या, गजी ढोल तसेच शनिवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ह. भ. प . वैभव सुरवसे माळशिरस यांची कीर्तन सेवा होणार आहे तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान कोकरे वस्ती वझरे तर्फे करण्यात आले आहे.