रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने मोफत रक्त तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने शहीद कामटे गणेशोत्सव मंडळ सांगोला येथे सर्वांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये रक्त शर्करा तपासून त्याचा रिपोर्ट लाभार्थी यांना देण्यात आला.
या तपासणी शिबिरात आजूबाजूच्या परिसरातील १०२ जणांनी तपासणी करून घेतली.या कार्यक्रमाप्रसंगी रो.डॉ.प्रभाकर माळी यांनी रक्त तपासणी करून घेण्याचे महत्त्व सांगितले.याप्रसंगी रोटरी क्लब सांगोल्याचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे व रो इंजि.विलास बिले यांनी रोटरी क्लबच्या कार्याची माहिती दिली.या रक्त तपासणी शिबिरासाठी संजीवनी पॅथॉलॉजी लॅब व रो.डॉ.महादेव कोळेकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
याप्रसंगी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री.अभिनंदन साळुंखे यांनी उपस्थिताचे स्वागत केले व शिबिर घेतल्याबद्दल रोटरी चे आभार मानले.
या कार्यक्रमास रोटरी सदस्य रो.इंजि.अशोक गोडसे ,रो. सुरेश अप्पा माळी,रो. इंजि.मधुकर कांबळे,तसेच गणेशोत्सव मंडळाचे सदस्य वैभव कोळसे,बलभीम कांबळे,रावसाहेब यादव,दत्तात्रय काशीद,सौदागर केदार आदी उपस्थित होते.