श्री बाळासाहेब श्रीरंग शिंदे सर आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित.

जवळे(प्रशांत चव्हाण) सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार कै.सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै.अण्णासाहेब घुले-सरकार कनिष्ठ महाविद्यालय जवळचे प्राचार्य श्री.बाळासाहेब श्रीरंग शिंदे सर यांना सपत्नीक सहपरिवार शिक्षक आमदार श्री.जयंत आसगावकर, माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री.सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.शेख साहेब, मुख्याध्यापक संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. तानाजी माने,मार्गदर्शक श्री.सुभाष माने यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हुतात्मा स्मृति मंदिर सोलापूर येथे उत्साही वातावरणात प्रदान करण्यात आला.
प्राचार्य श्री.बाळासाहेब शिंदे सर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष मा.आ.दीपक आबा साळुंखे पाटील,संस्था उपाध्यक्ष श्री.मानाजीराव घुले-सरकार,सचिव श्री. सुभाष लऊळकर सर,शिक्षक,शिक्षिका,प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदरप्रसंगी सर्व शिक्षक स्टाफ, मित्रपरिवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button