प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग उभारावेत- कृषी अधिकारी शिवाजी शिंदे

सांगोला :-प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग उभारावेत असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे .
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना(PMFME) अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी साठी ३५% अनुदान कृषि विभागामार्फत देण्यात येत आहे. सदरील योजना बँक कर्जाशी निगडित असुन यामध्ये १० ते ४०% स्वहिस्सा उभारणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत दुग्ध प्रक्रिया उद्योग, मसाले प्रक्रिया, तेल घाणे, डाळ प्रक्रिया, मिलेटस प्रक्रिया, बेकरी उद्योग , मका भरडा, पशुखाद्य , पापड उद्योग ,फळे प्रक्रिया , भाजीपाला प्रक्रिया आदी प्रक्रिया ऊद्योग उभारणी करता येतात.
या योजनेअंतर्गत नविन प्रक्रिया उद्योग किंवा जुन्या अस्तित्वात आसलेल्या प्रक्रिया उद्योगांचे विस्तारीकरण करता येते. सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक महिला किंवा पुरूष लाभार्थी लाभ घेऊ शकतात(शेतीची अट नाही).त्याचबरोबर बचत गट लाभार्थी (महिला व पुरूष गट) , शेतकरी उत्पादक कंपणी(FPO) , भागिदारी संस्था , सहकारी संस्था लाभ घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेणेसाठी आधारकार्ड, पॕनकार्ड ,बँक पासबुक,जागेचा उतारा, जागा स्वतःचे नावे नसेल तर भाडेकरार, मशिनरी चे कोटेशन आदी कागदपत्रे सादर करावी लागतात. ईच्छुक नागरिकांनी जिल्हा संसाधन व्यक्ती(DRP) , कृषि सहाय्यक , कृषि पर्यवेक्षक , मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि आधिकारी कार्यालयास आर्ज व कागदपत्रे सादर करावीत.असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे .